जगी ज्यास कोणी
नाही त्यास
देव आहे
निराधार आभाळाचा
तोच भार साहे
बाळ सोडुनी
ते दिधले कुंतीने
जळात
घरी रधिकेच्या
परि वाढले ते
सुखात
कर्णराज म्हणुनी
त्याचे नाव
अमर आहे
भक्त बाळ प्रल्हादाला
छ्ळीले पित्याने
नारसिंह रूपे
त्याला रक्षिले
प्रभूने
अलौकिक त्याची
महती अजुनी
विश्व गाये
साधुसंत कबिराला
त्या छळिति
लोक सारे
पांडुरंग रक्षी
त्याला प्राशुनी
निखारे
आसवेच त्यांची
झाली दुःखरूप
दोहे
|