लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग

कांती नवनवतीची, दिसे चंद्राची, प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्ह्ट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
दिसे नार सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात
चालणं ग मोठ्या नखरयाचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग

रूप सुरतीचा डौल, तेज अनमोल, सगुण गहिना
जशी का पिंजऱ्यातील मैना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
अशी ही चंचल मृगनयना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
निर्मळ कोमल तेज ग जैसे तुटत्या ताऱ्याचं
चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग
 
 
गीत - शाहीर होनाजी बाळा
संगीत - वसंत देसाई
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - अमर भूपाळी (१९५१)
For the printable version of this song, click here.