अपुरे माझे
स्वप्न राहिले
का नयनांनो
जागे केले ?
ओळख तुमची सांगुन
स्वारी
आली होती माझ्या
दारी
कोण हवे हो
म्हणता त्यांना
दटावून मज घरात
नेले
बोलत बसता वगळुन
मजला
गुपित चोरटे
ऐकू कशाला ?
जाण्याचा ते
करुनी बहाणा
गुपचुप माझ्या
मनात लपले
नीज सुखाची
तुम्हा लागली
मंद पाऊली स्वारी
आली
गोड खळीने चहाडी
केली
अधरासी नच बोलु
दिले
|