तू विसरुनि
जा रे विसरुनि
जा
तुझ्या जीवनी
चुकुनी आले,
चुकले होते
वाट
यौवनाची आली
चाहुल, तिथे
थबकले प्रीतीपाउल
परिचय झाला
आणिक अवचित
केली जिवाला
साथ
दिनराती ज्या
स्वप्नी रमले,
प्रीत-स्वप्न
ते पुरे भंगले
दृष्ट लागली
सांग कुणाची,
फसला सारा घाट
इच्छा एकच उरी
धरी मी, तुला
वरावे पुढल्या
जन्मी
या जन्मी तरी
असाच साहिन
दैवाचा उत्पात
|