वनवास हा सुखाचा,
सुखाचा, सुखाचा
दिनरात लाभताहे,
सहवास राघवाचा
हाते उभारलेली,
ही रम्य पर्णशाला
छायेत नांदता
या, आनंद ये
निराळा
भूमीवरी जणू
हा, संसार पाखरांचा
खांबास चार
वेळू, शाकारणी
तृणाची
कानी सुरेल
वाणी, माझ्याच
कंकणांची
कष्टे कमावलेल्या,
हो आस्वाद अमृताचा
हे सौख्य काय
देती साकेत
राजधानी ?
प्रीतीरसात
न्हाती, सुख-दुःख
भाव दोन्ही
प्रीती मिळे
पतीची, ह स्वर्ग
स्वामिनीचा
|