घन रानी साजणा
!
मी कशी तुझ्यासवे
चुकले वाट रे,
सांग ना
घन रानी साजणा
!
भिरभिर वाऱ्याची
थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी
मनभर गाण्याची
तरी बाई सूर
नवे नवे
सुखद मधुर वाटतात
हवे या मना
घन रानी साजणा
!
मधुमय समय असा
बहरुन कुंज
हसे
तरळत गंध नवा
वय ते लावी
पिसे
इथे तिथे गोड
निळेपण
बावरते मन साद
घालि कोण यौवना
?
घन रानी साजणा
!
किती अधीर अधीर
भाषा प्रीतीची
मन माझे, मन
माझे, मन बोलत
नाही ग माझे
किती लाजे,
किती लाजे,
वेडे लाजरे
ग मन माझे
एक शपथ शपथ
त्याला प्रीतीची
हृदया रे अदया
रे बोल ना
घन रानी साजणा
!
|