सुहास्य तुझे मनास मोही
जशी न मोही सुरा सूरा ही
तुझ्या लोचनी या प्रकाश विलसे
जयासी लोभे बघ चंद्रिका ही
तव यौवनाचा वसंत विहरे
जयासी लोभे बघ कोकिळ हा
गीत
-
शंकर बालाजी शास्त्री
संगीत
-
वझेबुवा
स्वर
-
पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक
-
कृष्णार्जुन युद्ध (१९२५)