अगं, काय सामना
करू तुझ्याशी,
नारी जात तू
दुबळी ग
हुकूम पाळीता
पुरूष जातीचा,
सरे जिंदगी
सगळी ग
बाळपणी तुज
धाक पित्याचा,
तरुणपणी तुज
हवा पती
वृद्धपणा तव
पुत्रा हाती,
स्वतंत्र बुद्धी
तुला किती ?
अरे नको वाढवण
सांगू शाहीरा,
पुरूष जातीची
फुकाफुकी
स्त्री जातीच्या
अकले पुढती,
तुझी बढाई पडेल
किती
सावित्रीच्या
चतूरपणाने यमधर्माला
दिला धडा
असेल ठावी कथा
जरी ती, बोल
मज पुढे घडाघडा
अग तूच सांग
ग कोणासाठी,
सावित्री ते
दिव्य करी
सावित्रीची
कथा सांगते,
पुरूष किर्तीची
मातब्बरी
पतीवाचून कसं
जगावे, हाच
जियेला प्रश्न
पडे
इथेच ठरला पुरूष
श्रेष्ठ ग,
चतूर सारीके
बोल पुढे
पुरुषावाचून
जन्मे नारी,
या पृथ्वीचा
कोण पती ?
पित्यावाचूनी
जन्मा आली,
काय थांबली
तिची गती ?
अग अज्ञानाने
नकोस बोलू,
आभाळाची सुता
धरा
गती कशाची सूर्याभोवती,
फिरे नार ती
गरागरा
पुरुषासाठी
नार जन्मते,
पुरुषासाठी
जन्म तिचा
वृक्षावाचून
जन्म पांगळा,
फुलारणाऱ्या
वेलीचा
अरे सांग शाहीरा
नारीवाचून पुरूष
ही झाला कधी
पुरा
पुराण शास्त्रे
धुंडून पाही,
वृद्ध गगन की
वसुंधरा
ताऱ्यामाजी
शुक्र नांदतो,
वाऱ्यापाठी
उभी हवा
पृथ्वी भोवती
चंद्र फिरतसे,
वेष घेऊनी नवा
नवा
हवा कशाला कलह
सांग हा, आपसातला
खुळ्या परी
हार जीतीची
हौसच खोटी,
तुझी न् माझी
बरोबरी
|