चिंचा आल्यात
पाडाला
हात नको लावूस
झाडाला
माझ्या झाडाला
!
माझ्या कवांच
आलंय् ध्यानी
तुझ्या तोंडाला
सुटलंय् पाणी
काय बघतोस राहुन
आडाला ?
मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर
वर खाली
फळ आंबुस येइल
गोडाला !
माझ्या नजरेत
गोफणखडा
पुढं पुढं येसी
मुर्दाडा
काय म्हणू तुझ्या
येडाला ?
|