तुझे रूप राणी, कुणासारखे ग ?
तुझे रूप राणी, तुझ्यासारखे ग !

तुझा रेशमी केशसंभार काळा
जणू नागिणीचा दिसे धुंद चाळा
बटा दोन भाळावरी की जिभा त्या
तिच्या मस्तिला कोण रोधू शके ?

तुझे दोन डोळे शराबी शराबी
हसे लाज गाली गुलाबी गुलाबी
असे रूपलावण्य मी प्रशितो हे
मला लाभले ते तुला पारखे !

उभी अप्सरा चिंब न्हाऊन येथे
नजर फेकीता रिते बाण-भाते
विधाता करी काय हेवा तुझा गे
न्याहळून पाही तुला कौतुके !
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - शेवटचा मालुसरा (१९६६)
For the printable version of this song, click here.