बहरुनि ये अणुअणू
जाहली रोमांचित ही तनु

नकळत मिळता नजरा दोन्ही
लहरत गेली वीज नसांतुनि
गेले, बाई, मी बावरुनी
किमया घडली जणू

उमलुन आली रात्र चांदणी
गंध दरवळे फुलावाचुनी
अंगांगावर लहर चंदनी
सुख लागे रुणुझुणू

दवापरी ते सुख टपटपले
ओठांनी या अलगद टिपले
आजवरी जे हृदयी जपले,
तेच लाभले जणू
 
 
गीत - डॉ. वसंत अवसरे (शांता शेळके)
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले
चित्रपट - अवघाचि संसार (१९६०)
For the printable version of this song, click here.