रामा रघुनंदना,
रामा रघुनंदना
आश्रमात या
कधी रे येशिल,
रामा रघुनंदना
मी न अहिल्या
शापित नारी
मी न जानकी
राजकुमारी
दीन रानटी वेडी
शबरी
तुझ्या पदांचे
अखंड चिंतन,
ही माझी साधना
पतितपावना,
श्री रघुनाथा
एकदाच ये जाता
जाता
पाहिन, पूजिन,
टेकिन माथा
तोच स्वर्ग
मज, तिथेच येईल,
पुरेपणा जीवना
|