आता जगायाचे
असे माझे किती
क्षण राहिले
?
माझ्या धुळीचे
शेवटी येथे
किती कण राहिले
?
हदुयात विझला
चंद्रमा ....
नेत्री न उरल्या
तारका ....
नाही म्हणायाला
तुझे हे आपुलेपण
राहिले !
अजुनी कुणास्तव
तेवतो हा मंद
प्राणाचा दिवा
?
अजुनी मला फसवायला
कुठले निमंत्रण
राहिले ?
ते लोक होते
वेगळे घाईत
जे गेले पुढे
....
मी मात्र थांबुन
पाहतो- मागे
कितीजण राहिले
?
कवटाळुनी बसले
मला दाही दिशांचे
हुंदके
माझे अता दुःखासवे
काही न भांडण
राहिले !
होता न साध्य
एवढा जो शब्द
मी तुजला दिला
एकाच शब्दाला
उभे आयुष्य
तारण राहिले
!
अवघ्या विजा
मी झेलल्या,
सगळी उन्हे
मी सोसली ...
रे बोल आकाशा,
तुझे आता किती
पण राहिले ?
ओसाड माझे घर
मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे
तेवढे अद्याप
तोरण राहिले
!
|