रंग माझा तुला
! गंध माझा
तुला !
बोल काहीतरी
! बोल माझ्या
फुला !
सांग लाजूनही
नाव आतातरी;
एक खोळंबले
गीत माझ्या
उरी;
अन् वसंतास
मी शब्द माझा
दिला !
वेळ जादूभरी
.... ही गुलाबी
हवा !
ही न मेंदी
तुझी, रंग माझा
नवा !
भास झाला खरा
! श्वास झाला
खुला !
हाय, माझी तुझी
भेट झाली अशी
:
शीळ यावी पुढे
चांदण्याची
जशी.
सांग, सोडू
कसा हात हातातला
!
|