अजुनी रुसून
आहे, खुलता
कळी खुले ना
मिटले तसेच
ओठ, की पाकळी
हले ना !
समजूत मी करावी,
म्हणुनीच तू
रुसावे
मी हास सांगताच,
रडताहि तू हसावे
ते आज का नसावे,
समजावणी पटे
ना
धरिला असा अबोला,
की बोल बोलवेना
!
का भावली मिठाची,
अश्रूंत होत
आहे
विरणार सागरी
ह्या जाणून
दूर राहे ?
चाले अटीतटीने,
सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला,
ऐसी मिठि जुटे
ना !
की गूढ काहि
डाव, वरचा न
हा तरंग
घेण्यास खोल
ठाव, बघण्यास
अंतरंग ?
रुसवा असा कसा
हा, ज्या आपले
कळेना ?
अजुनी रुसून
आहे, खुलता
कळी खुले ना
!
|