प्रिये पहा
रात्रीचा समय
सरुनि येत उषःकाल
हा ॥
थंडगार वात
सुटत ।
दीपतेज मंद
होत ।
दिग्वदनें स्वच्छ
करित ।
अरुण पसरि निज
महा ॥
पक्षि मधुर
शब्द करिति
। गंजारव
मधुप वरिति
।
विरलपर्ण शाखि
होति ।
विकसन ये जलरुहा
॥
सुखदुःखा विसरुनियां
। गेलें
जें विश्व लया
।
स्थिति निज
ती सेवाया
। उठलें
कीं तेंच अहा
॥
|