देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्याहातुन तेजोमय पूजा

चंदन व्हावा देहच केवळ
भाव फुलांची भरुनी ओंजळ
प्राणज्योतिने ओवाळिन मी देवांचा राजा

धन्य अशा या समर्पणाने
या जन्माचे होइल सोने
मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - वसंत देसाई
स्वर - आशा भोसले
चित्रपट - धन्य ते संताजी धनाजी (१९६८)
For the printable version of this song, click here.