का धरिला परदेश, सजणा
का धरिला परदेश ?
श्रावण वैरी बरसे झिरमिर
चैन पडेना जीवा क्षणभर
जाऊ कोठे, राहू कैसी,
घेऊ जोगिणवेष ?
रंग न उरला गाली ओठी
झरती आसू काजळकाठी
शृंगाराचा साज उतरला,
मुक्त विखुरले केश
गीत
-
शांता शेळके
संगीत
-
पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर
-
बकुळ पंडित
नाटक
-
हे बंध रेशमाचे (१९६८)
राग
-
मारुबिहाग
, ठुमरी (नादवेध)