बहरला पारिजात दारी
फुले का, पडती शेजारी ?

माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणि जन तिजसी म्हणती
दुःख हे, भरल्या संसारी !

असेल का हे नाटक यांचे,
मज वेडीला फसवायाचे ?
कपट का, करिति चक्रधारी ?

वारा काही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो, दौलत तिज सारी !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - माणिक वर्मा
पुणे आकाशवाणी संगितिका ’पारिजातक’
राग - मधुवंती (नादवेध)
For the printable version of this song, click here.