जा मुलि शकुंतले,
सासरी
आवरी डोळ्यांमधल्या
सरी !
वडिल मंडळी
असतिल कोणी
वागच त्यांच्या
अर्ध्या वचनी
सवतीलागी मानुन
बहिणी
राहि सदा हासरी
!
पतिसेवा हे
ब्रीद आपुले
देवाहुन ती
थोर पाउले
रागेजुन ते
जरी बोलले
बोलु नको त्यावरी
!
दोन्ही कुळांचे
नाव वाढवी
पतिव्रतेची
पदवी मिळवी
संसारी तुज
वाण नसावी
लक्ष्मी तू
साजिरी !
|