आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात
पंढरीचा राया दळी, जनीच्या घरात

किती करी काम देवा, घेई रे विसावा
हेच एक एवढे रे, मान किती घ्यावा
घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या राया
धावुनिया भक्तांपाठी, वृथा शिणवाया
जर थांबु दे रे देवा, कोमल हे हात

किती माझ्या संगे, गाऊनिया गाणी
भागलासि आता, तू रे चक्रपाणी
कटी पितांबर शोभे, गळा वैजयंतिमाला
असा हरी गरिबांच्या, झोपडीत झोपी गेला
सावळीच गोजिरी ही, मूर्ति सदा नयनात
 
 
गीत - शांताबाई जोशी
संगीत - गजानन वाटवे
स्वर - माणिक वर्मा
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.