हसले मनी चांदणे
जपुनि टाक पाउल
साजणी, नादतील
पैंजणे
बोचतील ग, फुलं
जाइची तुझी
कोमला काय
चांदण्यातही
सौंदर्याने
पोळतील ना पाय
?
पानांच्या जाळीत
लपोनी चंद्र
पाहतो गडे
सांग कुणाच्या
भेटीसाठी जीव
सारखा उडे
कुजबुजुनी कानात
सांगतो मधुप,
नको ग रुसू
लाजलाजऱ्या
कळ्याफुलांना
खुद्कन् आलं
हसू
हो जरा, बघा
की वरी, कळू
द्या तरी, उमटु
द्या वाणी
का आढेवेढे
उगाच, सांगा,
काय लाभले राणी
?
का ग अशा पाठीस
लागता मिळुनी
साऱ्या जणी
?
आज लाभला मला
माझिया सर्वस्वाचा
धनी
किति, किति
ग भाग्याची
भलतीच ओढ ही
कामसुंदराची
नव्हे ग श्यामसुंदराची
|