शरदाचे चांदणे,
मधुवनी, फुलला
निशिगंध
नाचतो गोपीजनवृंद,
वाजवी पावा
गोविंद !
पैंजणे रुणझुणती,
मेखला कटिवर
किणकिणती
वाहते यमुनाजळ
धुंद, वाजवी
पावा गोविंद
!
वारा झुळझुळतो,
फुलांचा सुगंध
दरवळतो
सांडतो भरुनी
आनंद, वाजवी
पावा गोविंद
!
धरुनिया फेर
हरीभवती, गोजिऱ्या
गोपी गुण्गुणती
आगळा रासांचा
छंद, वाजवी
पावा गोविंद
!
|