विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी

गुलाल उधळुनि नगर रंगले,
भक्तगणांचे थवे नाचले,
रामभक्तिचा गंध दरवळे,
गुढ्यातोरणे घरोघरी

आला राजा अयोध्येचा,
सडा शिंपिला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी,
आरती ओवाळती नारी

श्रीरामाचा गजर होऊनी,
पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी
भक्तियुगाची ललकारी
 
 
गीत - योगेश्वर अभ्यंकर
संगीत - बाळ माटे
स्वर - माणिक वर्मा
राग - भूप, नट (नादवेध)
For the printable version of this song, click here.