त्या सावळ्या
तनूचे
मज लागले पिसे
ग
न कळे मनास
आता
त्या आवरू कसे
ग !
ये ऐकण्यास
जेव्हा
त्याचा सुरेल
पावा
चोहीकडे बघे
मी
परि ना कुठे
दिसे ग !
हलतो तरू-लतांत
हा खोडसाळ वात
आलाच वाटतो
’तो’
मी सारखी फसे
ग !
खुपते तनूस
शेज
क्षणही न येत
नीज
डोळ्यास तो
दिसावा
हृदयात जो वसे
ग !
|