रंगरेखा घेउनी
मी भावरेखा
रेखिते
सावळे ते रूप
नाथा, लोचनी
मी पाहते !
श्यामकांती
पाहता ती, आसवे
ती दाटती
उर्मिलेच्या
भावऊर्मी, अंतरी
हेलावती
अंतरीची आर्तता
ती, आज गीत
छेडिते !
आपुल्या हो
संगती ते, राम
आणि जानकी
प्रीतीने विरही
परंतु, एकटी
मई मंचकी
आसवांची मालिका
मी, श्यामकंठी
घालते !
आपुल्या मी
दर्शनाला, आज
झाले पारखी
भेट होता आपुली
ती, जन्म होई
सार्थकी
एक आशा मीलनाची,
लोचनी जागते
!
|