माळ्याच्या
मळ्यामधी कोण
ग उभी
राखण करते मी
रावजी,
रावजी, हात
नका लावूजी,
पाहिल कुणी
तरी
औंदाचं ग वरीस
बाई मी सोळावं
गाठलं ग
चोळी दाटली
अंगाला बाई
कापड का फटलं
ग
काळीज माझं
धडधड करी, उडते
पापणी वरचेवरी
रावजी, हात
नका लावूजी,
पाहिल कुणी
तरी
नार गोमटी तू
देखणी ठुसका
बांधा ठसला
मनी
फुलराणी जीव
माझा साजणी
ग जड्ला तुझ्यावरी
रावजी, हात
नका लावूजी,
पाहिल कुणी
तरी
माळ्याच्या
मळ्यामधी कोण
ग उभी
वांगी तोडते
मी रावजी,
रावजी, हात
नका लावूजी,
पाहिल कुणी
तरी
गोऱ्या गालावरी
ग माझ्या लाली
लागली दिसू
ग
अंघोळीला बसले
मी माझं मलाच
येई हसू ग
पदर राहिना
खांद्यावरी
पिसाट वारं
भरलं उरी
रावजी, हात
नका लावूजी,
पाहिल कुणी
तरी
शुक्राची ग
तू चांदणी,
लाजू नको ग
नाही कुणी
मंजुळा, जीव
तुझ्यावर खुळा
ग झाला खरोखरी
|