हा रुसवा सोड सखे !
पुरे हा बहाणा सोड ना अबोला !
झुरतो तुझ्या विना, घडला काय गुन्हा ?
बनलो निशाना, सोड ना अबोला !

इष्काची दौलत उधळि तुझा हा नखरा
मुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा
फसवा राग तुझा, अलबेला नशिला
करि मदहोश मला
नुरले भान अता, जाहला जीव खुळा

तुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला
मदनाने केले मुष्किल जगणे मजला
पाहुनी मस्त अदा, फुले अंगार असा
सावरू तोल कसा ?
नको छळवाद अता, झालो कुर्बान तुला
 
 
गीत - वंदना विटणकर
संगीत - श्रीकान्त ठाकरे
स्वर - महंमद रफी
For the printable version of this song, click here.