चढाओढीने चढवीत
होते
ग बाई मी पतंग
उडवीत होते
होता झकास सुटला
वारा
वर पतंग अकरा-बारा
एकमेकांना अडवित
होते
ग बाई मी पतंग
उडवीत होते
काटाकाटीस आला
ग रंग
हसू फेसाळ घुसळीत
अंग
दैव हारजीत
घडवीत होते
ग बाई मी पतंग
उडवीत होते
माझ्या दोऱ्यानं
तुटला दोरा
एक पतंग येई
माघारा
गेला गुंतत
गिरवीत गोते
ग बाई मी पतंग
उडवीत होते
|