एक सूर एक ताल,
एक गाऊ विजयगान
जय जवान, जय
किसान !
जय जवान, जय
किसान, जय जय
!
अखिल देश पाठीशी
’जवान’ व्हा
रणी चला
किसान होऊनी
कसा भूमी सस्य
शामला
यौवनास योग्य
रे शौर्य आणि
स्वाभिमान
जय जवान, जय
किसान !
शत्रू मित्र
जाणुनी सावधान
सर्वदा
आपल्या श्रमे
करू प्रसन्न
देवी अन्नदा
उभ्या जगात
आपुली सदैव
उंच ताठ मान
जय जवान, जय
किसान !
अजिंक्य सैन्य
आमचे, गाजवी
पराक्रमा
भूमिदास दाखवी
निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद
देश हा, स्वतंत्र
सिंधू आसमान
जय जवान, जय
किसान !
|