माणुसकीच्या
शत्रुऊसंगे
युद्ध आमुचे
सरू
जिंकू किंवा
मरू
लढतिल सैनिक
, लढू नागरिक
लढतिल महिला,
लढतिल बालक
शर्थ लढ्याची
करू, जिंकू
किंवा मरू
देश आमुचा शिवरायाचा,
झाशीवाल्या
रणराणीचा
शिर तळहाती
धरू, जिंकू
किंवा मरू
शस्त्राघाता
शस्त्रच उत्तर,
भुई न देऊ एक
तसूभर
मरू पुन्हा
अवतरू, जिंकू
किंवा मरू
हानी होवो कितीहि
भयंकर, पिढ्या-पिढ्या
हे चालो संगर
अंती विजयि
ठरू, जिंकू
किंवा मरू
|