या लाडक्या
मुलांनो तुम्ही
मला अधार
नवहिंदवी युगाचे
तुम्हीच शिल्पकार
आईस देव माना,
वंदा गुरूजनांना
जगि भावनेहुनी
ते कर्तव्य
थोर जाणा
गंगेपरी पवित्र
ठेवा मनी विचार
शिवबापरी जगात
दिलदार शूर
व्हावे
टिळकांपरी सदैव
ध्येयास त्या
पुजावे
जे चांगले जगी
या त्याचा करा
स्विकार
शाळेत रोज जाता,
ते ज्ञानबिंदू
मिळवा
हृदयात आपुल्या
त्या देशाभिमान
ठेवा
कुलशील छान
राखा ठेवू नका
विकार
|