खानदेशी ! खानदेशी
गाव टुमदार,
नाव नंदुरबार,
तिथे सुकुमार,
शिरिष नावाचा
होता एक बाळ,
सोळा वर्षांचा
होता लडिवाळ
परि गोऱ्यांना
भासला काळ,
जी, जी, जी
आली आली ! आली
आली मिरवणुक
आली
मुले आणि मुली,
होती इवलाली,
उत्साहाला भरती
आली अनिवार
इंग्रजांना
राग आला त्याचा
फार
हुकुम दिला
करण्या गोळीबार,
जी, जी, जी