दान दिल्याने
ज्ञान वाढते,
त्या ज्ञानाचे
मंदिर हे
सत्य शिवाहुन
सुंदर हे
इथे मोल ना
दामाचे, मोती
होतिल घामाचे
सरस्वतीच्या
प्रेमाचे, प्रतीक
रम्य शुभंकर
हे
चिरा-चिरा हा
घडवावा, कळस
कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो
पढवावा, थेंब
अम्ही नच सागर
हे
त्यागाला या
नाव नसे, पुण्यवान
हा देश असे
कल्पतरू हा
उभा दिसे, त्या
छायेतील मंदिर
हे
|