गंजल्या ओठास
माझ्या धार
वज्राची मिळू
दे !
आंधळ्या आत्म्यात
माझ्या सूर्य
सत्याचा जळू
दे !
पांगळा बंदिस्त
माझा जन्म आकाशून
जावो;
वादळी आवेग
माझा चार भिंतींना
कळू दे !
सारखे सौंदर्य
माझ्या कोरड्या
गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व
माझे पेटताना
वर्दळू दे !
लाभु दे लाचार
छाया मोठमोठ्यांना
परंतू
तापल्या मातीत
माझा घाम मानाने
गळू दे !
आणु दे गा वंचकांना
क्रूस छ्द्माचा
दयाळा;
रक्त येशूचे
परी डोळ्यांत
माझ्या साकळू
दे !
|