उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे कसे मिटलेले
अजूनही अजूनही
!
सोनेरी हे दूत
आले
घरट्याच्या
दारापाशी
डोळ्यांवर झोप
कशी
अजूनही अजूनही
!
लगबग पाखरे
ही
गात गात गोड
गाणे
टिपतात बघा
दाणे
चोहीकडे चोहीकडे
!
झोपलेल्या अशा
तुम्ही
आणायाचे मग
कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या
!
बाळाचे मी घेता
नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिआ दूर
जाई
भूर भूर भूर
भूर !
|