नेउ नको माधवा, अक्रुरा नेउ नको माधवा
क्रूर अक्रुरा नकोस नेउ, आनंदाचा ठेवा

खेळगडी तो गोपाळांचा
गिरिधारी रे भक्तजनांचा
तारी गोकुळ कान्हा अमुचा
सर्व सुखाचा अमोल ठेवा

कुंजवनी रे रास रंगली
तालावरती टिपरी घुमली
धुंद रात्र रे स्वप्नी उरली
ऐकू दे मज मंजुळ पावा

नकोस नेऊ बालमुकुंदा
वेडी होइल गौळण राधा
तुला विनविती नंद-यशोदा
नेउ नको माधवा
 
 
गीत - योगेश्वर अभ्यंकर
संगीत - दशरथ पुजारी
स्वर - सुमन कल्याणपूर
For the printable version of this song, click here.