ह्यो ह्यो ह्यो पाव्हणा, शकुचा मेव्हणा
तुझ्याकडे बघुन हसतोय ग
काही तरी घोटाळा दिसतोय ग
काही तरी बाई घड्लंय खरं
फंदात पाखरू पडलंय खरं
मधावर माशी बसावी जशी
तसाच बिलगून बसतोय ग
प्रेमाचा फासा टाकून असा,
आपलासा हा कलास कसा ?
नवतीच्या नूरा, भुललाय पुरा
जाळ्यात मासा हा फसतोय ग
गुळाला मुंगळा चिटकुन बसं
मेतकुट तुमचं दिसतंय तसं
"होशील का राणी", लागून कानी
असंच काही तरी पुसतोय ग
तुझी नि त्याची तुटावी जोडी
अमृताची विटावी गोडी
म्हणून हा मेला, वामनचा चेला
मोठं मोठं डोळं वासतोय ग
गीत
-
संगीत
-
स्वर
-