नवीन आले साल
आजला
उजेड पडला नवा,
दिवा लाविते
दिवा
घरी पाहुणे
आले मामा
धरणीच्या घरी
जसा चंद्रमा
अंधाराला येई
उजाळा,
थंड सुवासिक
हवा
दिव्या-दिव्यांच्या
लावूनी ओळी
करिन साजरी
आज दिवाळी
आकशीही दिवा
चढविला,
आभाळा दे दुवा
लाख दिव्यांनो
उजेड फेका
अंधाराचा उरो
न ठिपका
कोना कोना आज
उजळु द्या,
इडापिडा शांतवा
|