सहज तुला गुपित
एक सांगते दुपारी
डोळियांत आली
गडे, प्रीत
माझी लाजरी
बैसते ओटीवरी,
नजर वळे अंगणी
अंगणात बहरते,
रानजाई देखणी
जाईखाली उभा
असे, हासरा
शिकारी
सांजवेळी गोठ्यातली
गाय लागे हंबरू
सोडते ग, धारेसाठी,
ओढ घेई वासरू
गोठ्यामधे दिसे
सखे, सावळा
मुरारी
पहाटेला ओठावरी,
गीत एक जागले
अंतरात कोणसे,
हळुच बाई बोलले
ओढाळले मन नेई,
माझिया सासरी
|