ओठांत हाक येते सानंद गीत गाता
येणार नाथ आता !

मी पाउले पहाते दारात थांबलेली
ये अंगणात छाया आधीच लांबलेली
लग्नात लाभलेला हो स्पर्षभास हाता !

आली फुलून गात्रे, ये प्राण लोचनांत
सारे मुहूर्त आले एका खुळ्या मनात
धारेत अमृताच्या गेला भिजून माथा !

आता नका क्षणांनो, दोघांत भिंत घालू
स्वर्गासवे मला द्या भूमीवरून चालू
ते प्राण नाथ माझे, मी दैवदत्त कांता !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सुवासिनी (१९६१)
राग - धानी (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.