श्रीरामाचे चरण धरावे
दर्शनमात्रे पावन व्हावे

सती अहिल्या दगडामाजी
शापित होऊन युगयुग मोजी
परी प्रभूच्या पदस्पर्शाने
पाषाणासहि जीवन द्यावे

उष्टी बोरे अर्पुन प्रभुला
शबरीने जणु ठाव पाहिला
स्वीकारुन ती रघुरायाने
देवपणाचे बीरुद ल्यावे

वनवासातच जीवन सरले
रामायणही तिथेच घडले
अयोध्य्येस प्रभु परतुन येता
प्रेमाश्रूंनी नगर भिजावे
 
 
गीत - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - सुमन कल्याणपूर
राग - पूरिया धनाश्री (नादवेध)
For the printable version of this song, click here.