या बकुळीच्या झाडाखाली, आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नांसाठी, एक रेशमी झुला झुले

इथेच माझी बाळ पाऊले दवात भिजली बालपणी
दूर देशीच्या युवराजाने इथेच मजला फुल दिले

तिनेच आसवे पुसली माझी हृदयामधला गंध दिला
चांदण्यातेले दोन कवडसे माझ्यासाठी अंथरले

बकुळी माझी सखी जीवाची जन्मांतरीचे प्रेम जुने,
मला पाहता फुलते ती अन्‌ तिला पाहता मी ही फुले
 
 
गीत -
संगीत -
स्वर -
For the printable version of this song, click here.