किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !

त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कुणी रडके नाही

नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही

तिथल्या वेली गाणी गाती, प-या हस-या येती जाती
झाडावरती चेंडु लटकती, शेतामधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - सुषमा श्रेष्ठ
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.