ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा, चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ झेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासती छ्प्पर, भिंती, दारे !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - सी. रामचंद्र
स्वर - राणी वर्मा, प्रमिला दातार, अरुण सरनाईक
चित्रपट - घरकुल (१९७०)
For the printable version of this song, click here.