नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत;
परी सारे हलक्याने : आड येते रीत.

नाही कशी म्हणू तुला ..... येते जरा थांब;
परी हिरव्या वळणांनी जायचे न लांब.

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी;
परी नीट, ओघळेल, हासतील कोणी.

नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव;
परी नको अधरांचा मोडू सुमडाव.

नाही कशी म्हणू तुला, जर लपूछपू;
परी पाया खडेकाटे, लागतात खुपू.

नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी;
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी.
 
 
गीत - आरती प्रभू
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
For the printable version of this song, click here.