आईसारखे दैवत
साऱ्या जगतावर
नाही
म्हणून श्रीकाराच्या
नंतर शिकणे
अ, आ, ई
मुलांनो शिकणे
अ, आ, ई
तीच वाढवी ती
सांभाळी
ती करी सेवा
तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी
मस्तक, आईच्या
पायी
कौसल्येविण
राम न झाला
देवकीपोटी कृष्ण
जन्मला
शिवरायाचे चरित्र
घडवी, माय जिजाबाई
नकोस विसरू
ऋण आईचे
स्वरूप माउली
पुण्याईचे
थोर पुरुष तू
ठरून तियेचा,
होई उतराई
|