एक फुलले फूल
आणि फुलून नुसते
राहिले
त्या कुणी ना
पाहिले, त्या
कुणी ना पाहिले
मंद अगदी गंध
त्याचा, मंद
इवले डोलणे
साधले ना, मुळीच
त्याला नटुनथटुनी
लाजणे
कोवळे काळिज
त्याचे परि
कुणासी मोहिले
त्या ’कुणा’ला
काय ठावे, या
फुलाची आवडी
तो न आला या
दिशेला, वाट
करुनी वाकडी
या फुलाला मात्र
दिसली, दुरुन
त्याची पाऊले
एक दुसरे फूल
त्याने, खुडुन
हाती घेतले
या फुलाचे जळून
गेले, भाव अगदी
आतले
करपली वेडी
अबोली, दुःख
देठी राहिले
|