कर आता गाई
गाई
तुला गाते मी
अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली
बाई ?
बोळक्यांची
उतरंडी
लुटुपुटीची
चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकुल
!
काम सारे उरकता
थकला ग माझा
जीव
नको छ्ळू तूही
राणी
येऊ दे ना जरा
कीव ?
नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते
झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास
बोलावू का ?
|