मैना राणी, चतुर-शहाणी, सांगे गोड कहाणी
कहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी

सिंव्ह वनाचा असतो राजा, भिती त्याची चित्ती
वाघ वागतो भिउन त्याला, गुडघे टेकी हत्ती
अति चतूर पण कोल्हा कोणी, सिंव्हा पाजी पाणी

कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा
घरी बोलावुन पाण‍उतारा करी पाहुण्याचा
कडीवर त्या कडी करुनिया, टोला कोल्हा हाणी

शाल म्हणुनिया खाल पांघरे गाढव वाघाची
त्यास पाहता झोप उडाली जंगल भागाची
एक कोंबडा उघडकीस पण ढोंग त्याचे आणी
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - कृष्णा कल्ले
For the printable version of this song, click here.